नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने आज आपले पतधोरण नुकतेच जाहीर केले. रिव्हर्स रेपो आणि रेपो दर जैसे थे असल्याची घोषणा आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज केली आहे. रिव्हर्स रेपो आणि रेपो दर देखील कायम राहणार असल्याचे गव्हर्नर दास यांनी म्हटले आहे.
शक्तीकांत दास यांच्या या घोषणेने कर्जदारांना पुन्हा एकवेळ दिलासा मिळाला आहे. मात्र या कालावधीत कर्जावरील व्याजमाफीबाबत त्यांनी कुठलाही खुलासा अद्याप केलेला नाही. सवलतीच्या कालावधीत कर्जावरील व्याज माफ व्हावे या बाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण दाखल आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.