खामगावला सिनेमागृह मॅनेजरविरुद्ध वकीलांची तक्रार

On: June 25, 2022 9:03 AM

बुलढाणा : खामगाव शहरातील एका सिनेमागृहात हंबीरराव मोहीते हा चित्रपट सुरु आहे. सदर चित्रपट बघण्यासाठी पुरेसे प्रेक्षकच न आल्याने हा चित्रपट दाखवण्यात आला नाही. तिकीटे खरेदी करुन सिनेमा बघण्यासाठी आलेल्या दोघा वकीलांचा हिरमोड झाला. चित्रपट दाखवला नाही म्हणून त्यांनी सिनेमागृहाच्या व्यवस्थापकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवार 23 जून रोजी साडेसहा वाजता अ‍ॅड.राजेश भूपेंद्र टाले (61) रा.नाथ प्लॉट व त्यांचे मित्र अँड.व्ही.वाय.देशमुख असे दोघे वकील मित्र हंबीरराव मोहिते हा चित्रपट बघण्यासाठी आले होते. चित्रपट सुरु होण्याची बराच वेळ वाट बघून देखील चित्रपट काही सुरु झालाच नाही. प्रेक्षकांची संख्या अत्यल्प असल्यामुळे चित्रपट दाखवता येणार नसल्याचे कारण दोघा वकिलांना देण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment