पिस्टल व कारसह चौघांना अटक

On: June 25, 2022 2:16 PM

जळगाव : पाचोरा पोलिसांनी केलेल्या कारवाईत चौघांना विना परवाना पिस्टल बाळगतांना त्यांच्या ताब्यातील कारसह अटक करण्यात आली आहे. पाचोरा परिसरात या कारवाईने खळबळ माजली आहे. कल्पेश अनिल निकम रा. भाग्यलक्ष्मी नगर पाचोरा, रोहीत साहेबराव झोडगे रा. उत्तम नगर शेवपुरी चौक नाशिक, नितीन साहेबराव नासरे रा. पारस ता. बाळापूर जिल्हा अकोला व सचिन नथु पाटील रा. पांडव नगरी पाचोरा अशी अटकेतील चौघांची नावे आहेत.

24 जूनच्या पहाटे तिन वाजता भडगाव ते पाचोरा रस्त्यावर निर्मल सिडस कंपनी नजीक पांढ-या इंडीका वाहनातील चौघांची पोलिस पथकाने झडती घेतली असता त्यांच्या कब्जात सुमारे 25 हजार रुपये किमतीचे विना परवाना पिस्टल आढळून आले. त्यांच्या कब्जातील कारसह पिस्टल जप्त करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस नाईक विकास खैरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला आर्म अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रकाश पाटील पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment