भावाच्या मारहाणीत बहिणीचा मृत्यू

On: June 26, 2022 11:50 AM

यवतमाळ : किरकोळ कारणावरुन उद्भवलेल्या वादात एकाने त्याच्या बहिणीला मारहाण केली. या मारहाणीत जखमी बहिणीचा नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी 24 जून रोजी नेर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या भावाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

पल्लवी कमलदास सवाई (22) असे मयत बहिणीचे तर राजेश कमलदास सवाई (35) असे आरोपी भावाचे नाव आहे. दोघेही सख्खे बहीण-भाऊ असून ते नेर तालुक्यातील कोहळा पुनर्वसन येथे रहात होते. मयत बहिणीचे वडील कमलदास सवाई (60) यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्ररीच्या आधारे नेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment