अंमली पदार्थ विरोधी दिन – स.पो.नि. जालिंदर पळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जळगाव : 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत जिल्हा पोलिस दलाच्या वतीने उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात आयोजीत करण्यात आलेल्या शिबीरात स.पो.नि. जालींदर पळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा पोलिस दलाच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात एनसीसी, 18 महाराष्ट्र बटालियन कार्यक्षेत्रातील विद्यालय आणि महाविद्यालयातील 450 विद्यार्थी – विद्यार्थिनींचा सहभाग असलेले दहा दिवसाचे वार्षिक प्रशिक्षण घेण्यात आले होते. या शिबीरात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरिक्षक जालिंदर पळे पळे यांनी उपस्थित विद्यार्थी वर्गाला मार्गदशन केले.

याप्रसंगी स.पो.नि. जालींदर पळे यांच्यासह सहायक फौजदार रमेश जाधव, हे.कॉ. सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, महेश महाजन तसेच 18 महाराष्ट्र बटालीयन जळगावचे कर्नल प्रविण धिमन, लेफ्टनंट कर्नल पवन कुमार, कोमलसिंग, सुनील पालवे, जय बहादुरसिंग, नरेंद्र सिंग, शैलेंद्र कुमार, प्रदिप कुमार, ककलीज, बलवान सिंग, राजु राम, महिपाल सिंग, गुलझार अहमद, सतिष कुमार, अरुण कुमार, मेजर डॉ. अरुण वळवी, लेफ्टनंट शिवराज पाटील, चिफ ऑफीसर डी. एस. पाटील, युवराज पाटील, तृष्णा तळेले, दिपाली खडके आदींचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here