जनमत प्रतिष्ठान, मुक्ताई महिला संस्थेच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

On: June 26, 2022 2:35 PM

जळगाव : जळगाव येथील मुक्ताईनगर – प्रेमनगर परिसरात दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला संस्थेच्या वतीने आयोजीत या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला.

याप्रसंगी महापौर सौ जयश्री महाजन उपस्थित होत्या. सुमारे पन्नास विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना महापौर जयश्री महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी नगरसेविका सौ नीता सोनवणे यांच्यासह पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाप्रमुख कुणाल मोरे, अ‍ॅड. हेमंत दाभाडे, शिरीष पाटील, हर्षाली पाटील, हेमंत वैद्य, किशोर पाटील, बाळू नाले, किरण पाटील, राकेश भाई आदी उपस्थित होते. जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक विजय वानखेडे यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment