जळगाव : पोदार इंटरनॅशनल स्कुलमधे दि. 25 रोजी ‘चेंज मेकर – ह्युमन राइट’ च्या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थी-पालक वर्गाचे जॉईंट सेक्रेटरी चेतन चव्हान यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालक शिक्षक संघाचे राहुल शुक्ला, सचिन खंबायत, सौ. नैना अत्तरदे आदी याप्रसंगी उपस्थित होते. इयत्ता पहिली ते आठवीच्या 450 विद्यार्थ्यांच्या सहभागाने गीत गायन, वेशभूषा, नाटिका, प्रश्नमंजुषा, विविध प्रकारचे खेळ आदींचे सादरीकरण झाले. भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, मलाला, मार्टिन ल्युथर अशा महान हस्तींच्या जीवन कार्याचा परिचय यावेळी करुन देब्ण्यात आला. मानवी हक्काची जाणीव या विषयावर प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण उत्तम रितीने केले. शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ महाजन यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेचे उप-प्राचार्य दिपक भावसार,पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका सौ. उमा वाघ, प्रशासकीय अधिकारी जितेंद्र कापडे, वरिष्ठ समन्वयक, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.