बसमधे चढतांना महिलेचे तिन लाखांचे दागिने लंपास

On: June 28, 2022 10:12 AM

जळगाव : सुनेला भेटण्यासाठी पारोळा येथून धुळे येथे जाणा-या बसमधे चढत असतांना गर्दीचा गैरफायदा घेत महिलेच्या पर्समधील 3 लाख 9 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे. या घटनेप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशाबाई विश्वास पाटील (रा. म्हसवे ता. पारोळा) यांच्या ताब्यातील पर्स मधून हा ऐवज चोरीला गेला आहे. यात 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा 4 तोळे वजनाचा सोन्याचा हार, 1 लाख 20 हजार रुपये किमतीच्या 4 तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, 60 हजार रुपये किमतीचा सोन्याचा राणीहार, 9 हजार रुपये किमतीची 3 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी अशा मुद्देमालाचा समावेश आहे. पुढील तपास पो.नि. रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार बापुराव पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment