चार हजाराच्या लाचेत सहायक फौजदार आणि पोलिस नाईक

On: June 29, 2022 12:46 AM

जळगाव : सुरुवातीला पाच हजार आणि तडजोडीअंती चार हजार रुपयांची लाच मागणी आणि स्विकार केल्याप्रकरणी सहायक फौजदारासह पोलिस नाईक अशा दोघांना एसीबी पथकाने ताब्यात घेतले आहे. चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार अनिल रामचंद्र अहिरे आणि पोलिस नाईक शैलेश आत्माराम पाटील अशी दोघांची नावे आहेत.

तक्रारदार यांच्या मुलीने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला तिच्या सासरच्या मंडळींविरुद्ध भादवि कलम-498 अ आणि इतर कलमान्वये दि.19/03/3022 रोजी गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याच्या कागदपत्रांमध्ये मदत करु तसेच चार्जशीट लवकरात लवकर पाठवुन गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे सहायक फौजदार अनिल अहिरे यांनी पंचासमक्ष 4,000/- रुपये लाचेची मागणी केली. पोलिस नाईक शैलेश पाटील यांनी त्यास प्रोत्साहन दिले. सदर लाचेची रक्कम दोघे हजर असतांना सहायक फौजदार अनिल अहिरे यांनी स्वतः चाळीसगाव शहरातील सिग्नल पाईंटजवळील एका चहाच्या टपरीवर पंचासमक्ष स्वीकारली.

पोलिस उप अधीक्षक शशिकांत एस.पाटील यांच्या पथकातील पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ आदींनी सदर सापळा यशस्वी करण्याकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment