पोलिस शिपायांची 7231 पदे भरली जाणार

मुंबई : सन 2020 च्या पोलिस शिपाई संवर्गातील 7231 रिक्त पदे भरण्याची राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात आली असून अगोदर शारीरिक मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. मैदानी चाचणीत यशस्वी उमेदवार लेखी परिक्षेत पात्र राहणार आहेत.

पोलिस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणीचे एकूण गुण 50 राहतील. यात पुरुष उमेदवारांना 1600 मीटर धावणे – 20 गुण, 100 मीटर धावणे -15 गुण, गोळाफेक -15 गुण असे एकुण 50 गुण राहणार आहेत. महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे – 20 गुण, 100 मीटर धावणे -15 गुण, गोळाफेक – 15 गुण असे एकुण 50 गुण राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दलातील सशस्त्र पोलिस शिपाई (पुरुष) पदासाठी शारीरिक चाचणीसाठी 100 गुण राहणार आहेत. पुरुष उमेदवारासाठी 5 किलोमीटर धावणे -50 गुण, 100 मीटर धावणे 25 गुण, गोळाफेक – 25 गुण असे एकूण 100 गुण राहतील. शारीरिक चाचणीत किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीस पात्र राहतील. लेखी परिक्षा मराठी भाषेत दिड तासाची असेल. लेखी परिक्षेत किमान चाळीस टक्के गुण मिळवणे क्रमप्राप्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here