अमरावती कारागृहातून तीन कैदी फरार

On: June 29, 2022 1:32 PM

अमरावती : अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहातून तीन कैद्यांनी मंगळवारच्या भल्या पहाटे दोन भिंती ओलांडून पलायन करण्यात यश मिळवले आहे. दोन भिंती ओलांडण्यापूर्वी तिघा कैद्यांनी बॅरेकच्या मागील बाजूला असलेल्या गेटचे कुलूप तोडून ठेवले होते. फरार तिघा कैद्यांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

पलायन केलेल्या तिघांपैकी एक कैदी कोकणातील रत्नागिरीचा कुख्यात कैदी आहे. साहिल अजमत कळसेकर (33), रा. नायासी, ता.चिपळूण जि. रत्नागिरी, रोशन गंगाराम उईके (22) आणि सुमित शिवराम धुर्वे (23), दोघेही रा. शेंदुरजना घाट जि. अमरावती अशी पलायन केलेल्या तिघांची नावे आहेत. साहील कळसेकर हा कुख्यात कैदी प्राणघातक हल्ल्यात दोषी आढळला असून रत्नागिरी न्यायालयाने त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment