फरार सावकाराचा भाऊ संजय बंब अटकेत

On: June 30, 2022 10:16 AM

धुळे : अवैध सावकार राजेंद्र बंब याचा मोठा भाऊ संजय बंब याला मालेगाव शहरातून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. राजेंद्र बंब याच्यावर कारवाईची धार प्रखर केल्यानंतर संजय बंब फरार झाला होता. बुधवारी अटक केलेल्या राजेंद्र बंब यास गुरुवारी 30 जून रोजी न्यायालयात हजर केले जाईल.

अवैध सावकारी उघडकीस आल्यानंतर राजेंद्र बंब याच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेने कारवाईचा पिळ आवळला. त्यानंतर संजय बंब याच्या घरातून देखील पोलिसांच्या हाती घबाड लागले. फरार राजेंद्र बंब याच्या मागावर असलेल्या पोलिस पथकाला तो मालेगाव येथे असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे त्याला तेथून अटक करण्यात आली. संजय बंब व त्याच्या परिवाराच्या लॉकरमध्ये 77 लाख 93 हजार रुपयांची रोकड, 7 लाख 51 हजारांचे सुमारे 149 ग्रॅम सोन्याचे दागिने, सुमारे 490 कोरे धनादेश, 244 स्टॅम्प व एफडी असा मुद्देमाल मिळून आला होत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment