अभिनेत्रीकडे खंडणी मागणा-या दोघा बनावट पोलिसांना अटक

On: June 30, 2022 11:03 AM

मुंबई : पोलीस असल्याची बतावणी करत प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका देसाईकडे खंडणी मागण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अजून एका आरोपीचा शोध सुरु आहे.

अमली पदार्थाचे सेवन केल्याचा आरोप करत आपण पोलिस असल्याची बतावणी करत दोघांनी अभिनेत्री कृतिकाला धमकावले होते. चित्रीकरण आटोपून कृतिका घरी जात असतांना गोरेगाव फिल्मसिटी ते गोकुळधाम दरम्यान दुचाकीवरील तिघांनी तिची गाडी अडवली. गाडीत अमलीपदार्थ असून तपासणी करायची आहे अशी बतावणी करत तिघे तिच्याशी वाद घालू लागले.

कृतिकाने तिघांना त्यांचे ओळखपत्र मागीतले असता तिघांनी पिवळे कागद दाखवत तिच्या हातांचा वास घेण्याचा प्रयत्न केला. तिला संशय आल्याने तिने महिला पोलिसांना बोलावण्याचा आग्रह धरला. तसेच तिने या घटनेचे चित्रीकरण सुरु केले. त्यानंतर तिघांनी तेथून पलायन केले. दिंडोशी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केल्यानंतर पोलिसांनी पवन विश्वकर्मा (28) व शंकर पंदीधर (27) अशा दोघांना अटक केली. विश्वकर्मा हा गोरेगाव आणि पंदीधर हा मालाड येथील रहिवासी आहे. अतुल भोसले (35) हा फरार असून त्याचा शोध सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment