मोबाईलद्वारे ऑफलाइन पेमेंट आरबीआय देणार परवानगी

On: August 6, 2020 8:25 PM

नवी दिल्ली : डेबिट अथवा क्रेडिट कार्डवरुन पैसे हस्तांतरण करतांना ते पेमेंट अनेकदाअयशस्वी होते.  इंटरनेट समस्येमुळे अथवा अन्य काही कारणास्तव ते पेमेंट पुर्ण होवू शकत नाही. मात्र आता लवकरच एक पर्याय समोर येणार आहे.  कार्ड आणि मोबाईलच्या माध्यमातून ऑफलाईन पेमेंट करता येणार आहे. 

रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाने प्रायोगिक तत्वावर कमी रक्कमेच्या पेमेंटसाठी ऑफलाईन सेवेला परवानगी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या योजनेच्या अंतर्गत अधिकृत पेमेंट सिस्टम ऑपरेटर (पीएसओ),  बँका आणि नॉन बँक कार्ड, वॅलेट्स आणि मोबाईलचा वापर करुन ऑफलाईन पेमेंट सेवा देण्यास तत्पर राहणार आहेत. स्दर योजना ३१ मार्च २०२१ पर्यंत राहणार आहे.

मोबाईल फोन, कार्ड, वॉलेट या सुविधांचा उपयोग करुन डिजिटल पेमेंटमध्ये वाढ झाली आहे. असे असले तरी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या काही भागात असते. या समस्येमुळे पेमेंट ट्रान्स्फर होण्यास अडचण येते. त्यासाठी ऑफलाईन पेमेंट सुविधा देण्याची ही योजना आणली जाणार आहे.

ऑफलाइन मोडमध्ये कार्डचा वापर केल्यानंतर डेटा आणि व्यवहारांचा तपशील साठवला जाईल. त्यानंतर त्या व्यवहाराची पावतीदेखील मिळेल. ज्यावेळी इंटरनेट सेवा सुरु होईल त्यावेळी पुढील प्रक्रियेसाठी तुम्ही संग्रहित केलेला डेटा पेमेंटसाठी वापरण्यात येईल.

डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून या ऑफलाइन पेमेंटची सेवा पुरवण्यात आली आहे. त्यासाठी ग्राहकांना काही अटी शर्थीचे पालन करावे लागणार आहे. पेमेंटच्या वेळी कार्डस, वॅलेट्स अथवा मोबाईलचा वापर करुन तसेच अन्य पर्यायाद्वारे पेमेंट करु शकतील. रिमोट किंवा प्रॉक्सिमिटी मोडमध्ये देखील पेमेंट करु शकतात. या व्यवहारासाठी कुठल्याही अतिरिक्त परवानगीची गरज राहणार नाही. दोनशे रुपयांपेक्षा जास्त व्यवहाराची मर्यादा या योजनेत असेल. ऑफलाइन व्यवहारांसाठी अधिकाधिक २ हजारापर्यंत मर्यादा राहिल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment