जळगाव पोलिस उप विभागातील नागरिकांसाठी जनता दरबार

On: July 1, 2022 7:18 PM

जळगाव : जळगाव पोलिस उप विभागात जळगाव शहर, रामानंद नगर, जिल्हापेठ, शनीपेठ, एमआयडीसी, जळगाव तालुका असे पाच पोलिस स्टेशन येतात. या पाच पोलिस स्टेशन हद्दीच्या अंतर्गत येणा-या शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी 2 जुलै 2022 रोजी तक्रार निवारण दिनाचे (जनता दरबार) आयोजन करण्यात आले आहे.

सदर जनता दरबार 2 जुलै रोजी सकाळी दहा ते बारा वाजेच्या दरम्यान पोलिस मल्टीपर्पज हॉल क्रिडा संकुल जळगाव येथे आयोजीत करण्यात आला आहे. संबंधीत नागरिकांनी आपल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच काही अडी अडचणी असल्यास या दिवशी दिलेल्या वेळेत हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी तक्रार पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंता, उप विभागातील सर्व प्रभारी अधिकारी हजर राहणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment