तरुणाच्या हत्येप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल

On: July 2, 2022 12:47 PM

जळगाव : जामनेर तालुक्यातील गारखेडा शिवारात 24 व 25 जून दरम्यान तरुणाच्या हत्येप्रकरणी 1 जुलै रोजी जामनेर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाम फकीरा ठाकरे (35) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत शाम ठाकरे या तरुणाची पत्नी विंध्या शाम ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात मारेक-याविरुद्ध सदर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील गारखेडा खुर्द शिवारातील नर्सरी परिसरातील जंगलात शाम ठाकरे याचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी पोलिस उप अधिक्षक भरत काकडे, स्थानीक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, जामनेर पोलिस स्टेशनचे पो.नि. किरण शिंदे आदींनी भेट दिली होती. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप राठोड पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment