अखेर सीबीआयने रिया वर नोंदवला गुन्हा

On: August 6, 2020 10:01 PM

नवी दिल्ली : सुशांत सिंग राजपूत याच्या कथित आत्महत्या प्रकरणी सीबीआयने रिया चक्रवर्तीसह एकुण सहा जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. मयत बॉलीवुड अभिनेता याची मैत्रीण रिया चक्रवर्ती सह सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, गुन्हेगारी कटकारस्थान रचणे, चोरी-फसवणूक आणि धमकी असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या अगोदर सुशांत सिंगच्या वडिलांच्या तक्रारीनुसार पटना येथे रिया चक्रवर्ती विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सीबीआयने बिहार पोलिसांकडून आजपर्यंतच्या गुन्हयाच्या तपासाच्या कागदपत्रांची मागणी केली आहे.   सीबीआयचं विशेष पथक सुशांतच्या मृत्यू संदर्भात सखोल चौकशी करणार आहे. यात डीआयजी मनोज शशिधर, एसपी नुपूर प्रसाद यांचा सहभाग राहणार आहे. बिहार पोलिसांनी २५ जुलै रोजी भा.द.वि. कलम ३४१, ३४८, ३८०, ४०६, ५०६, ४२०,१२०ब नुसार गुन्हा दाखल केला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment