जळगाव : पत्ता विचारण्याचा बहाणा करत दुचाकीवरील दोघा अज्ञातांनी महिलेची सोन्याची चेन ओरबाडून नेल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शालिनी दिगंबर पाटील, रा. जीवन नगर या जेष्ठ नागरिक गृहिणी 3 जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता आपल्या घराजवळ असतांना दुचाकीवरील दोन अज्ञात इसम त्यांच्याजवळ आले. पत्ता विचारण्याचा बहाणा करत मोटार सायकलवर मागे बसलेल्या अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची 65 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावली. त्यानंतर मोटार सायकलने दोघांनी पलायन केले. या घटनेत चेन हिसकावणा-याच्या बोटाचे नख शालिनी पाटील यांना लागल्याने त्यांना गळ्याजवळ जखम झाली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला दोघा अज्ञात मोटार सायकलस्वारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. रोहीदास गभाले करत आहेत.