औरंगाबाद : आज औरंगाबाद येथील खवड्या डोंगरावरुन एका तरुणाने उडी घेत आत्महत्या केली. या आत्महत्येचा प्रसंग एकाएकी काही तरुणांच्या मोबाईलमधे चित्रीत झाला. हा व्हिडीओ बघून अनेकांच्या थरकाप झाला.
काही दिवसांपूर्वी याच डोंगरावर आत्महत्येची एक घटना घडली होती. आज पुन्हा झालेल्या आत्महत्येच्या या घटनेने हा डोंगर म्हणजे जणू काही आत्महत्येचे ठिकाण आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान रस्त्याच्या दिशेने काही तरुण आपल्या मोबाइलमधे व्हिडीओ शूट करत होते. त्याच वेळी हा आत्महत्येचा प्रसंग शुट झाला. पोलिस या तरुणाचा शोध घेत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने अजूनच खळबळ माजली आहे. सध्या लॉकडाऊन, नैराश्य, आर्थिक चणचण असे एक ना अनेक कारणे आत्महत्येस कारणीभूत ठरत आहेत.