आरटीओ तपासणी नाक्यावर मिळणार निरोध

अक्कलकुवा : अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयाच्या एकात्मिक समुपदेशन आणि उपचार केंद्र तसेच महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लिमिटेड यांच्या सहकार्याने गव्हाळी येथे असलेल्या आरटीओ तपासणी नाक्यावर निरोध स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले आहे. ट्रक चालकांसह गरजूंसाठी या “निरोध स्टेशन’ची स्थापना करण्यात आली आहे.

या ठिकाणी ट्रकचालक व गरजूंना कधीही मोफत निरोध उपलब्ध होणार आहेत. केंद्राचे समुपदेशक महेश कुवर यांनी याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. संदीप वसावे यांनी ट्रकचालकांची आरोग्य व अर्चना भायेकर यांनी नेत्र तपासणी याप्रसंगी केली. परिवहन निरीक्षक प्रवीण सर्जेराव, किरण देवरे, वैशाली पवार, योगेश पवार, राजेंद्र पाडवी, मच्छिंद्र वळवी, राजकुमार पाटील, शरद पाडवी, प्रदीप कुमार सिंग, आशिष गुप्ता, रामेश्वर मंडारे, प्रवीण पाटील, विकास वळवी, विनोद भोये यांच्यासह आरटीओ चेक पोस्टचे अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here