नाशिकमध्ये अफगाणिस्तानच्या धर्मगुरुचा खून

On: July 6, 2022 1:02 PM

अफगाणिस्तानच्या धर्मगुरुंची गोळ्या झाडून नाशिक शहरात हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेने खळबळ माजली आहे. ख्वाजा सय्यद चिश्ती (35) असे या धर्मगुरुचे नाव आहे. ‘सुफी बाबा’ या नावाने ते ओळखले जात होते. डोक्यात गोळी झाडल्याने सुफीबाबा यांचे जागीच निधन झाले आहे. हत्या केल्यानंतर हल्लेखोर कारने पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. दरम्यान पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरु आहे.

या हत्येप्रकरणी प्रमुख संशयित हा चालक असल्याचे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलतांना सांगितले आहे. सय्यद चिश्ती हे गेल्या काही वर्षापासून नाशिकमधील येवला शहरात रहात होते. या हत्येमागे धार्मिक कारण असल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळली असून आर्थिक वाद असल्याचे देखील म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment