चोरीच्या बारा मोटार सायकलींसह चोरट्यास अटक

On: July 7, 2022 8:43 PM

जळगाव : जळगाव, धुळे, मालेगाव, नाशिक परिसरातून मोटार सायकल चोरी करणा-या चोरट्यास जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातून एलसीबी पथकाने अटक केली आहे. विकास उर्फ विक्की शिवाजी महाले असे अटक करण्यात आलेल्या मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे.

अटकेतील विकास महाले याच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या 2 लाख 22 हजार रुपये किमतीच्या बारा दुचाकींसह त्याला चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अनिल देशमुख, पो.ना. राहुल पाटील, पो.ना. किरण चौधरी, पो.ना. प्रितम पाटील, पो.ना. प्रमोद लाडवंजारी, पोकॉ ईश्वर पाटील व चालक पो. कॉ. प्रमोद ठाकुर आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. चाळीसगांव शहर पो.स्टे. ला दाखल भाग-५ गुरन 181/2022 भादवि कलम 379 हा गुन्हा उघडकीस आला आहे. अटकेतील आरोपीकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment