चाळीसगावला बकरी इदची कुर्बानी एक दिवस उशिरा

On: July 8, 2022 4:21 PM

जळगाव : हिंदु बांधव साजरा करत असलेली आषाढी एकादशी आणि मुस्लीम बांधव साजरा करत असलेला बकरी इद हा सण हे दोन्ही एकाच दिवशी येत आहेत. सदर अडचण लक्षात घेत चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी मुस्लीम बांधवांना पाचारण करत एक बैठक घेतली.

आषाढी एकादशीचे पावित्र्य राखण्यासाठी बकरी इदची कुर्बानी एक दिवस पुढे ढकलावी अशी विनंती पो.नि. संजय ठेंगे यांनी मुस्लिम बांधवांना केली. उपस्थित मुस्लीम बांधवांनी पो.नि. ठेंगे यांच्या विनंतीला मान देत स्वखुशीने त्यांची सुचना वजा विनंती मान्य केली. यावेळी हसत खेळत चर्चा झाली. एकादशी झाल्यानंतर बकरी इदची कुर्बानी देण्याबाबत मुस्लिम बांधवांनी तसे निवेदन पो.नि. संजय ठेंगे यांना दिले.

सदर बैठकीस पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण, धरमसिंग सुंदरडे इतर स्टाफ तसेच जावेद शब्बीर शेख रा. पाटणा, दाऊद अकबर पठाण रा. तांबोळा, नुर अली शौकत अली रा. तांबोळा, समशोद्दीन सांडू सैय्यद रा. हिरापुर, वसिम युनूस खाटीक रा. लोजा, अलिमशाह हबीब शाह रा. लॉजा, राजू इकबालशाह फकीर रा. लोजा, परवेज गफ्फार खाटीक रा. लोजा, शेख युनुस शेख ईस्माईल रा. तांबोळा, शब्बीर खाँ समशेर खाँ रा. तांबोळा इत्यादी खाटीक बांधव हजर होते. सर्वांना पो.नि. संजय ठेंगे यांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment