झोपेतच चौघांची गळा चिरुन हत्या

On: August 7, 2020 10:16 AM

नांदगाव : नाशिक जिल्हयाच्या नांदगाव तालुक्यातील वखारी या गावी एकाच परिवारातील चौघा सदस्यांची झोपेतच निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मध्यरात्री झालेल्या या घटनेने मनमाड – नांदगाव सह नाशिक जिल्हयात खळबळ उडाली आहे.

नांदगाव तालुक्यातील वखारी या गावी राहणा-या चव्हाण परिवारातील दोन लहान मुले व त्यांच्या आईवडिलांची हत्या करण्यात आली. या परिवारातील हत्या झालेल्या मुलांचे वय चार आणी सहा वर्ष आहे. घराबाहेर झोपलेल्या या परिवारातील चव्हाण परिवाराचा खून कुणी व का केला हा एक गहन प्रश्न य निमीत्ताने निर्माण झाला आहे.

समाधान चव्हाण (37) भरताबाई चव्हाण (32) गणेश चव्हाण (6) आरोही  चव्हाण (4) अशी खून झालेल्या चौघांची नावे आहेत. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ भेट देत पुढील तपासाची कारवाई सुरु केली आहे. पुढील तपास सुरु आहे.

झोपेतच चौघांची गळा चिरुन हत्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment