वॉटरपार्क मधून मोबाईल चोरणा-यास अटक

On: July 8, 2022 8:36 PM

जळगाव : शिरसोली येथील जलतरण तलावाच्या उघड्या लॉकरमधून मोबाईलची चोरी करणा-या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. भुषण नथ्थु बडगुजर रा. कढोली ता. एरंडोल असे अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोरट्याचे नाव आहे.

भुषण बडगुजर हा तरुण एरंडोल तालुक्यातील कढोली गावात चोरीचे मोबाईल विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली. त्या माहितीच्या आधारे तपासकामी त्यांनी आपले सहकारी सहायक फौजदार युनुस शेख इब्राहिम, पोहेकॉ अशरफ निजामाद्दीन शेख, पोहेकॉ जितेंद्र पाटील, पोहेकॉ अक्रम शेख, पोना नितीन बाविस्कर, पोना नंदलाल दशरथ पाटील, पोना किरण धनगर, पोना प्रमोद लाडवंजारी, पोना भगवान तुकाराम पाटील, पोना राहुल मधुकर बैसाणे, चापोहेकॉ भारत पाटील आदींचे पथक तयार केले. सदर तपास पथकाने भुषण बडगुजर याचा सुरुवातीला कढोली गावात शोध घेतला. तो बांभोरी बस स्थानक परिसरात फिरत असल्याचे समजताच त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीत एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील सोळा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आढळून आले. मोबाइलसह त्याला अटक करण्यात आली. शिरसोली येथील झुलेलाल वाटरपार्क येथे असलेल्या उघडया लॉकरमधून दोन्ही मोबाईल चोरी केल्याचे त्याने कबुल केले. पुढील तपासकामी त्याला एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment