पोलिस निरीक्षक के.के.पाटील नियंत्रण कक्षात

On: July 9, 2022 8:32 AM

जळगाव : चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कांतीलाल पाटील (के.के.पाटील) यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचा अतिरिक्त पदभार ग्रामीण पोलिस स्टेशनचे पो.नि. संजय ठेंगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पो.नि. संजय ठेंगे यांच्याकडे सध्या दोन्ही पोलिस स्टेशनचा चार्ज आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशावरुन अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी याबाबत बदलीचे आदेश काढले आहेत. राजकीय व्यक्तीचे नातेवाईक असलेले पो. नि. के.के. पाटील यांनी चाळीसगाव शहरात एका किर्तनाच्या कार्यक्रमात नारदाच्या गादीवर पाय ठेवत कार्यक्रम बंद पाडला होता. याशिवाय शहर पोलिस स्टेशनमधे काही दिवसांपुर्वी दोघे पोलिस लाच घेतांना एसीबी पथकाच्या हाती लागले होते. प्रशासकीय कारणास्तव पुढील आदेश होईपर्यंत त्यांना नियंत्रण कक्षात वर्ग करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment