मनोरुग्ण मुलाची आईकडून सुपारी देत हत्या

On: July 9, 2022 11:39 AM

नाशिक (नांदगाव) : मनोरुग्ण मुलाचा त्रास असह्य झाल्याने पोटच्या मुलाची पंधरा हजार रुपयात सुपारी देत आईनेच हत्या केल्याची घटना नांदगाव तालुक्यात ढेकू या गावी उघडकीस आली आहे.

सुपारी घेणारा संशयित समाधान दौलत भड हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. जन्याबाई या महिलेच्या मनोरुग्ण मुलाला फिट येत होते. तिने गावातील समाधान भड याला पंधरा हजार रुपयांची मुलाला ठार करण्याची सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. भड याने गुरुवारी जन्याबाईचा मुलगा जनार्दन याच्या डोक्यात पहारीने घाव घालत ठार मारले. ठार केल्यानंतर त्याचा मृतदेह साईनाथ राठोड यांच्या शेतात फेकून दिला. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक निरीक्षक दीपक सुरवडकर, उपनिरीक्षक मनोज वाघमारे, अनिल गांगुर्डे, सागर कुमावत आदी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment