नंदुरबार : नंदुरबार तालुका पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात मदत करण्याच्या बदल्यात सहा हजाराची लाच घेणा-या हवालदारास पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुनिल अर्जुन अहिरे (57) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर पोलिस हवालदाराचे नाव आहे. सुनिल अहिरे याने सुरुवातीला 12 हजार व नंतर तडजोडीअंती सहा हजार रुपयांची तक्रारदारास लाच मागितली होती. लाचेची रक्कम स्विकारतांना अहिरे यास 7 जुलै रोजी एसीबी पथकाने ताब्यात घेतले.
तक्रारदारासह इतर तिघांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिस स्टेशनला 11 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात मदत करण्याकामी सहा हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. लाच स्विकारतांना ताब्यात घेतलेल्या हवालदार अहिरे यास 9 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
नाशिक परिक्षेत्राचे अधिक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे, नंदुरबार पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक समाधान वाघ, पोहेकॉ विलास पाटील, पोना अमोल मराठे, मपोना ज्योती पाटील, पोहवा विजय ठाकरे, पोना मनोज अहिरे, पोना संदीप नावाडेकर व पोना देवराम गावित यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.