इंदुरीकर महाराजांची आज न्यायालयात सुनावणी

इंदोरीकर महाराज

संगमनेर : अमुक दिवशी स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो अथवा मुलगी होते असे वादग्रस्त विधान करुन वादाच्या भोव-यात सापडलेले कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांची आज संगमनेर न्यायालयात सुनावणी आहे. संगमनेर न्यायालयात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. आज त्यांना संगमनेर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इंदुरीकर महाराजांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर समाजातून टीका झाली होती. काही संघटनांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र महाराजांनी हे विधान केव्हा आणि कुठे केले याचा पुरावा नव्हता. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवत याबाबतचे पुरावे जमा केले. ते उरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिले. त्यानंतर 26 जून रोजी संगमनेर न्यायालयात जिल्हा आरोग्य प्रशासनाने महाराजांविरुद्ध गुन्हा नोंद केला.

‘सम तिथीला स्त्री संग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते. स्त्री संग जर अशुभ  वेळेस झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होत असल्याचे महाराज म्हणाले होते. पुढे बोलतांना ते म्हणाले होते की जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब होते. पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला होता. त्यामुळे रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आले.  

आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला म्हणून त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला होता.  हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला त्यामुळे भक्त प्रल्हाद जन्माला आल्याचे महाराज म्हणाले होते. पीसीपीएनडीटी च्या सल्लागार समितीने या प्र्सारित झालेल्या व्हिडीओ बाबत महाराजांना नोटीस पाठवून खुलासा मागीतला आहे. किर्तनातून लोकांना हसवणा-या महाराजांची या प्रकरणाने चिंता वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here