भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिने आत्महत्या करत आपले जिवन संपुष्टात आणले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सिने कलावंतांचे आत्महत्या सत्र सुरु आहे. मुंबईच्या दहिसर येथील राहत्या फ्लॅटमध्ये अनुपमा पाठक हिने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली आहे. चाळीस वर्षाच्या अनुपमा आत्महत्येच्या एक दिवस आधी फेसबुक लाईव्ह आली होती. तिने फॅन्ससोबत संवाद साधला होता.
कुणावर विश्वास ठेवू नका असे तिने फेसबुक लाईव्हमध्ये म्हटले होते. तिला कशाप्रकारे फसविण्यात आले होते याबद्दल ती फेसबुक लाईव्हमधे बोलली आहे. ती रहात असलेल्या फ्लॅटमधून एक सुसाईड नोट सापडली असून त्यात तिने आत्महत्या का केली याची दोन कारणे सांगितली आहेत. ”माझ्या एका मित्राच्या सांगण्यावरून मी मालाडच्या विस्डम प्रोड्यूसर कंपनीत 10000 रुपये गुंतवले आहेत.
कंपनी मला हे पैसे डिसेंबर 2019 मध्ये देणार होती मात्र, आता टाळाटाळ केली जात असल्याचे तिने म्हटले आहे.” अनुपमाने या चिठ्ठीत मनीष झा या व्यक्तीचे देखील नाव घेतले आहे. मनिष झा याने लॉकडाऊन काळात आपली स्कूटर घेतली होती. मात्र नंतर ती परत केली नाही असे तिने म्हटले आहे.