तलवार बाळगणा-याविरुद्ध कारवाई

जळगाव : महामार्गानजीक खेडी बु. येथील माऊली नगर परिसरातून तलवार बाळगणा-या तरुणास ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. निलेश रावसाहेब पाटील असे सदर तरुणाचे नाव आहे. त्याच्या कब्जातील तलवारीसह त्याला अटक करण्यात आली आहे. पो.कॉ. छगन तायडे यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

पो.नि.प्रताप शिकारे यांच्या पथकातील सहायक फौजदर अतुल वंजारी, पोलिस नाईक किशोर राजाराम पाटील, सुधीर संजय साळवे व मुदस्सर काझी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. न्यायालयाच्या आदेशाने आरोपी निलेश पाटील याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here