बुलडाणा येथील खून प्रकरणातील दोघा आरोपींना पोलिस कोठडी

On: July 12, 2022 7:35 AM

बुलडाणा : अनैतिक संबंधात अडसर ठरत ठरणा-या प्रियकराच्या वडिलांची एका महिलेने मित्राच्या मदतीने हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी शहरात उघडकीस आली होती. या प्रकरणी शहर पोलिसांनी तपास करून अवघ्या काही तासांत महिलेसह तिच्या मित्रास जेरबंद केले. ११ जुलै रोजी दोन्ही आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सागवन परिसरातील रहिवासी दिनेश बाबुराव आराख (४२) याच्या मुलाचे विधवा लिलाबाई सोबत प्रेमसंबंध सुरु होते. याची कुणकुणा लागताच वडील दिनेश आराख यांनी त्या महिलेस तंबी दिली होती. त्यामुळे त्या महिलेने आपला मित्र सागर मगरे यास सांगून दिनेश आराख यांचा काटा काढण्यास सांगितले. त्यावर सागरने निर्दयीपणे डोक्यात दगड घालून दिनेश आराख यांची हत्या केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment