प्रेमप्रकरण उघड झाल्याने प्रेमीयुगल घाबरले ; दोघांच्या धमकीमुळे तरुणाने जीवन संपवले

On: July 12, 2022 2:29 PM

जळगाव : प्रेमप्रकरणाची माहिती नातेवाईकांना देणा-या तरुणाला प्रेमीयुगुलाने बघून घेण्याची धमकी दिली. प्रेमीयुगुलाने दिलेली धमकी मनाला लावून घेत तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना चोपडा तालुक्यात घडली. या घटनेप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला प्रेमीयुगुलाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील तरुणीचे चोपडा तालुक्यातील नरवाडे येथील तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. या लव्ह स्टोरीची माहिती वर्डी येथील चंद्रशेखर राजेंद्र धनगर या तरुणाला मिळाल्याचे समजते. त्याने या प्रेमप्रकरणाची माहिती नातेवाईकांना दिल्याचा प्रेमीयुगुलाचा आरोप आहे. त्यामुळे त्याला बघून घेऊ अशी धमकी प्रेमीयुगुलाने दिल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या धमकीला घाबरुन राजेंद्र धनगर याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या वडीलांनी केला आहे. या आरोपाला अनुसरुन राजेंद्र धनगर यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उप निरीक्षक तांबे करत आहेत. संशयीतांना अद्याप अटक नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment