भंगार सामान चोरी करणा-या तिघांना अटक

On: July 12, 2022 10:28 PM

जळगाव : वावडदा ते म्हसावद रस्त्यावरील पावर प्लॅंट कंपनीतील भंगार सामान चोरी करणा-या तिघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. जगदीश कैलास गोपाळ, सुभाष रोहीदास गोपाळ, दिपक गोपीचंद गोपाळ सर्व रा. वावडदा – जळगाव अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

वावडदा ते म्हसावद रस्त्यावर गुरुप्रभा पॉवर प्लॅंट ही कंपनी असून या कंपनीतील सुमारे बारा हजार रुपये किमतीचे भंगार सामान 11 जुलै रोजी चोरी झाल्याचे उघडकीस आले होते. या चोरीप्रकरणी सुपरवायझर विजय यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासात तिघांना अटक करण्यात आली असून मुद्देमाल जप्त करण्याचे काम बाकी आहे. अटकेतील तिघांना न्यायालयाने 14 जुलै पर्यंत पोलिस कोठडीत रवानगीचे आदेश दिले आहेत. पोलीस नाईक स्वप्नील पाटील, हेमंत पाटील, होमगार्ड नितीन चिंचोले, मयूर सोनवणे आदींनी आरोपींच्या अटक करण्याकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment