खूनाच्या गुन्हयातील फरार बंदीस अटक

On: July 13, 2022 5:16 PM

जळगाव : खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगतांना कोविड-19 अभिवचन रजेवर जेलमधून बाहेर आलेल्या फरार बंदीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. वसंत उर्फ जयकुमार ढोमन अहिरे रा.भोईवाडा अमळनेर असे अटक करण्यात आलेल्या बंदीचे नाव आहे.

अमळनेर पोलीस स्टेशनला दाखल खूनाच्या गुन्ह्यात अमळनेर सत्र न्यायधिशांनी वसंत अहिरे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असतांना अहिरे यांना 5 जून 2022 पर्यंत कोविड 19 अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. मात्र मुदत उलटून गेली तरी ते कारगृहात हजर झाले नाही. फरार बंदी आरोपी वसंत अहिरे त्यांचे गावी अमळनेर येथे असल्याची माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांना जेरबंद करण्याकामी हे.कॉ. संदीप रमेश पाटील, पोना प्रविण जनार्दन मांडोळे यांना रवाना करण्यात आले. त्यांना अमळनेर येथून अटक करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment