दफनविधी झालेल्या तरुणीच्या मृत्युबद्दल संशय

On: July 14, 2022 12:03 PM

जळगाव : गळफास घेतल्यानंतर दफनविधी झालेल्या तरुणीच्या मृत्युबाबत संशय आल्याने तिचा मृतदेह उकरुन तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी सावदा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे.

नजमा सलमान तडवी (19) रा. लोहारा ता. रावेर असे गळफास घेतल्याने मरण पावलेल्या तरुणीचे नाव आहे. या तरुणीचा दफनविधी झाल्यानंतर तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिचा मृतदेह उकरुन तपास होण्याची विनंती करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक डी.डी. इंगोले पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment