जामनेर येथील खूनाचा गुन्हा एलसीबीने केला उघड

जळगाव : जामनेर पोलिस स्टेशनला दाखल खूनाचा गुन्हा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केला आहे. मद्याच्या नशेत शिवीगाळ करणा-या तरुणाचा वन विभागाच्या वॉचमनने हा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. नथ्थु काळू सुरळकर रा.चिंचखेडा ता. जामनेर असे हत्या करणा-या वॉचमनचे तर श्याम फकिरा ठाकरे रा. गंगापुरी ता.जामनेर असे मयत तरुणाचे नाव आहे.

नथ्थु काळु सुरळकर हा वनविभागाच्या ड्युटीवर असतांना श्याम फकिरा ठाकरे हा घटनेच्या दिवशी त्याच्या झोपडी जवळ आला होता. मद्याच्या नशेत तो नथु सुरळकर यास शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रयत्न करत होता. त्याची शिवीगाळ व मारहाणीचा प्रयत्न थांबत नव्हता. त्यामुळे फावड्याच्या दांड्याने गळा दाबून नथु सुरळकर याने शाम ठाकरे याची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

सुरुवातीला या घटनेप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला अज्ञात इसमाविरुद्ध भाग 5 गु.र.न. 294/22 भा.द.वि. 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, चापोहेकॉ विजय चौधरी, भारत पाटील, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ जयंत भानुदास चौधरी, पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पोहेकॉ संदिप श्रावण सावळे, पोना रणजित अशोक जाधव, पोना किशोर ममराज जाधव, पोकॉ विनोद सुभाष पाटील, पोकॉ ईश्वर पंडीत पाटील, चापोना दर्शन हरी ढाकणे, चापोका प्रमोद ठाकुर आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here