जळगाव : सूर्याच्या दक्षिणायन वेळी जुलै ते ऑगस्ट या कालावधीत भारतात शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. मात्र या कालावधीत सुर्यप्रकाश असावा. कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दुपारच्या वेळी माथ्यावर येतो. उत्तरायण होतांना एकदा आणि दक्षिणायन होतांना एकदा असे दोनवेळा दुपारच्या वेळी शून्य सावली दिवस येतात.
सूर्य दररोज 0.50 अंश पुढे सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्यामुळे एकाच जागेवरुन दोन दिवस शून्य सावलीचा अनुभव आपल्याला घेता येतो. मध्य प्रदेशातून 24 जुलै ते अंदमान निकोबार येथून 25 ऑगस्टपर्यंत भारतात शून्य सावलीचा अनुभव मिळतो. पावसाळा कालावधीत महाराष्ट्रात उत्तर सीमेनजीक 12 जुलै ते दक्षिण सीमेवर 10 ऑगस्टपर्यंत सूर्य डोक्यावर येत असतो. या कालावधीत आकाशात ढग नसल्यास दुपारी 12 ते 12.30 दरम्यान शुन्य सावलीचा अनुभव घेता येतो.
15 जुलै गोंदिया, 16 जुलै नंदुरबार, 17 जुलै भंडारा, नागपूर, अकोट,18 जुलै जळगाव, अमरावती, भुसावळ,19 जुलै धुळे, वर्धा, 20 जुलै अकोला, मालेगाव, वाशीम, 21 जुलै यवतमाळ, बुलडाणा, 22 जुलै गडचिरोली, 23 जुलै चंद्रपूर, नाशिक 24 जुलै हिंगोली, जालना, औरंगाबाद, 25 जुलै पालघर, हिंगोली, 27 जुलै अहमदनगर, मुंबई, ठाणे, नांदेड, परभणी, 28 जुलै बीड, नवी मुंबई, 29 जुलै अलिबाग, 30 जुलै पुणे, लातूर, 31 जुलै उस्मानाबाद, 2 ऑगस्ट सोलापूर, सातारा, 5 ऑगस्ट सांगली, रत्नागिरी, 6 ऑगस्ट कोल्हापूर, 8 ऑगस्ट सिंधुदुर्ग असे शुन्य सावलीचे दिवस राहणार आहेत.