पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या 9 जणांना वाचवण्यात यश

On: July 19, 2022 7:44 AM

जळगाव : जिल्ह्यातील गारबर्डी धरणात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या 9 तरुणांना वाचवण्यात यश आले आहे. पट्टीच्या पोहणा-यांच्या व दोराच्या मदतीने वाहून गेलेल्या तरुणांना तिरावर सुखरुप आणले गेल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. पुरात वाहून गेलेले व बचावलेले सर्व नऊ तरुण मुक्ताईनगर तालुक्यातील आहेत.

या घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक देवीदास इंगोले व त्यांच्या सहका-यांनी लागलीच भर पावसात घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक तरुणांच्या मदतीने दोरखंडाला धरुन नऊ तरुणांचे जीव वाचले आहेत. बचावलेल्या तरुणांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. गणेश पोपटसिंग मोरे (28) – एकनाथ नगर मुक्ताईनगर, आकाश रमेश धांडे (24) एकनाथ नगर मुक्ताईनगर, पियुष मिलिंद भालेराव (23) – एकनाथ नगर मुक्ताईनगर, जितेंद्र शत्रूंग पुंड (30) रा. चिखली ता. मुक्ताईनगर, मुकेश श्रीराम धाडे (19) रा.एकनाथ नगर मुक्ताईनगर, लखन प्रकाश सोनवणे (25) रा.एकनाथ नगर मुक्ताईनगर, अतुल प्रकाश कोळी (22) रा.एकनाथ नगर मुक्ताईनगर, विष्णू दिलीप बोरसे (19) रा. एकनाथ नगर मुक्ताईनगर व रमेश सोनवणे (24) रा एकनाथ नगर मुक्ताईनगर.

या तरुणांना वाचवणा-या तरुणांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – संतोष दरबार राठोड (जिल्हा अध्यक्ष राष्टीय बंजारा रा. पाल – रावेर), इम्रान शाह इकबाल शाह रा.पाल, रतन भंगी बारेला रा. गारखेडा, दारासिंग रेवालसिंग बारेला गारबर्डी, गोविंदा चौधरी रा.खिरोदा, सिकंदर गुलजार भिल रा. पाल ता. रावेर. सध्या पावसाचे दिवस असून कुणीही अशा ठिकाणी पिकनिकला अथवा फेरफटका मारण्यासाठी जावू नये असे कळकळीचे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक देवीदास इंगोले यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment