औरंगाबाद : औरंगाबादच्या गणेशनगर भागातील रहिवासी समिना रस्तुम शेख या महिलेने पतीच्या विरहात 4 जुलैच्या रात्री गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली होती. तत्पुर्वी समिना तडवी यांनी सतरा वर्षाची मुलगी आयेशाचा गळा दाबून खून केला होता. मुलगा समीर यास आत्महत्या करण्यास सांगितले होते. समिरने आत्महत्या करण्यासाठी आपल्या दोन्ही हातांवर व गळ्यावर ब्लेडने वार केले होते. मात्र तो वाचला.
बचावलेला मुलगा समीर याने पोलिसांना कथन केलेल्या घटनाक्रमात या आत्महत्या व खूनाचा उलगडा झाला आहे. 4 जुलैच्या रात्री नेमके काय घडले याचा उलगडा बचावलेल्या समिरने पुंडलीक नगर पोलिसांना सांगितला. ३१ जुलै रोजी कोविडमुळे त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. तेव्हापासून सामुहिक आत्महत्येचा विचार त्याची आई समीना, जुळी बहिण आयेशा व समिरने केला. या बाबत नातेवाईकांना कुणकुण लागली होती.
नातेवाईकांनी समिनाची समजूत काढून तिला आत्महत्येपासून प्र्वृत्त केले होते. मात्र सामुहीक आत्महत्येवर सर्व जण ठाम होते. 4 ऑगस्ट रोजी रात्री झोपेच्या गोळ्या घेवून तिघे जण झोपले होते. मात्र तरीदेखील सकाळी चार वाजेच्या सुमारास सर्वांना जाग आली. समिनाने आयेशाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिने स्वत: पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
काही वेळाने गळफास असलेली साडी समिरने कापून त्याच्या आईला मयत आयेशाजवळ झोपवले. त्यानंतर समिरने आपल्या हातावर ब्लेड मारुन घेतले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. तो बेशुद्ध झाला तरी देखील वाचला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब करत आहेत.