फरार आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

On: July 19, 2022 10:21 PM

जळगाव : पोलिसांना हव्या असलेल्या फरार आरोपींची शोध मोहीम सध्या सुरु आहे. या मोहिमे अंतर्गत एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक करण्यात आली आहे. इम्रान खान हयात खान रा. भोईवाडा आव्हाणे ता. जळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या एक वर्षापासून तो पोलिसांना हवा होता.

फरार आरोपी इम्रान खान हा जळगाव शहरात असल्याची माहिती पोलिस नाईक मुदस्सर काझी यांना समजल्यानुसार त्याला पथकाने अटक केली आहे. पो.नि. प्रताप शिकारे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, मुदस्सर काझी, सुधीर साळवे, इमरान सैय्यद, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment