जळगाव शहरात खूनाची घटना

On: July 20, 2022 9:50 PM

जळगाव : जळगाव शहरातील शाहू नगर परिसरातील रेल्वे लाईननजीक तरुणाची तिक्ष्ण हत्याराने हत्या झाल्याची घटना आज 20 जुलै रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

रहिम शहा मोहमंद शहा असे मयत तरुणाचे नाव निष्पन्न झाले असून तिघांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. मयत रहिम शहा हा गेंदालाल मिल परिसरातील रहीवासी असून अज्ञात आरोपींविरुद्ध शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताच्या पत्नीने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. दारुच्या नशेत तिघांनी रहिम शहा याची हत्या केल्याचे म्हटले जात आहे. गेंदालाल मिल परिसरातील तिघा तरुणांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment