जळगाव : सलग दोन वर्ष नक्षलग्रस्त भागात चिकाटीने खडतर सेवा बजावल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाने येथील एमआयडीसी पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले सहायक पोलिस निरिक्षक संदीप हजारे तसेच पोलिस उप निरिक्षक संदिप पाटील यांना अतिरिक्त सुरक्षा पदक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र राज्यातील 1 हजार 172 अधिका-यांना हे पदक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी हे पदक जाहीर केले आहेत. पोलिस उप निरिक्षक संदिप पाटील यांना गेल्या वर्षीदेखील पोलिस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर झाले होते. नक्षलग्रस्त भागातील कामगिरीबाबत आतापर्यंत त्यांना एकुण चार पदके प्राप्त झाली आहेत. स.पो.नि. हजारे तसेच पो.उ.नि. पाटील यांना जाहीर झालेल्या या पदकाबद्दल पोलिस दलासह समाजाच्या विविध स्तरातून कौतुक होत आहे.