मुकेश राजपूत हत्येप्रकरणी त्याच्या पत्नीला न्यायालयीन कोठडी

On: July 22, 2022 10:19 AM

जळगाव : प्रेमसंबंधात अडसर ठरणा-या तरुणाची दोघा मित्रांनी हत्या केल्याचा प्रकार 9 मे रोजी उघडकीस आला होता. या घटनेत हत्या झालेल्या तरुणाच्या पत्नीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. हत्या झालेल्या तरुणाच्या पत्नीचा या घटनेत सहभाग असल्याचे उघडकीस आले. तिला 19 जुलै 2022 रोजी अटक करण्यात आली. 20 जुलै रोजी तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

निखील राजेश सोनवणे या तरुणाचे मयत मुकेश राजपूत याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे. निखील सोनवणे याच्या सांगण्यावरुन अमर शांताराम बारोट व पराग उर्फ बबलु रविंद्र आरखे या दोघांनी मुकेश यास गोलाणी व्यापारी संकुलाच्या तिस-या मजल्यावरुन खाली फेकून दिले होते. त्यात त्याचे निधन झाले होते. या घटनेतील संशयित निखील सोनवणे सोबत मयताच्या पत्नीचे 7 व 8 मे रोजी बोलणे झाल्याचे उघड झाले आहे. कॉल डीटेल्स तपासणीत हा प्रकार उघड झाला आहे. निखील, अमर व पराग यांना यापुर्वीच अटक झाली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. घटनेचा पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप परदेशी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment