जळगाव : साग, नीम व बाभूळ अशा प्रजातीच्या लाकडाच्या चोरट्या वाहतुकीवर चाळीसगाव तालुक्यातील कोदगांव शिवारात चाळीसगाव वन विभागाने कारवाई केली आहे. आयशर (एमएच 04 डीएस 4813) या वाहनातून अवैध चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती 17 रोजी वन विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत पकडलेल्या आयशर वाहनासह अवैध लाकडे जप्त करण्यात आली आहेत.
उपवनसंरक्षक विवेक होसिंग , सहा वनसंरक्षक सु.का. शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल शितल नगराळे , वनपाल गुलाब पिंजारी, रामदास चौरे, वनरक्षक सी. व्ही. पाटील, योगेश देशमुख, काळू पवार , संजय चव्हाण, रविंद्र पवार, वनमजूर बाळू शितोळे व भटू अहिरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.





