जळगाव शहरातील पिंप्राळ्यात आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

On: July 22, 2022 3:01 PM

जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा उपनगरातील केदारनाथ नगर परिसरात आज सकाळी अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. नाल्यातील वाहत्या पाण्यात आढळून आलेला तरुणाचा मृतदेह कुणाचा आहे याबाबत शोध सुरु आहे.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पो.नि. विजय शिंदे आदी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले. वाहत्या पाण्यातील तरुणाच्या मृतदेहाची पाहणी करण्यात आली. अज्ञात तरुणाचा मृतदेह कुठून तरी पाण्यात वाहून आला असल्याचे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment