फोटो व्हायरल केल्याचा जाब विचारणा-या महिलेचा विनयभंग

On: July 25, 2022 11:12 AM

जळगाव : बाजारात आईसोबत गेलेल्या तरुणीचा फोटो काढून तो व्हाटसअ‍ॅप वर व्हायरल केल्याबद्दल जाब विचारण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकातील बाजारात तरुणी तिच्या आईसह 22 जुलै रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या दरम्यान गेली होती. त्यावेळी अमिन खान अहमद खान याच्यासोबत काही तरुण त्याठिकाणी हजर होते. यावेळी अमिन खान हा तरुणीकडे बघून हसू लागला. सदर तरुणीचे फोटो व्हाटसअ‍ॅप वर व्हायरल केल्याचा जाब तिच्या आईने अमिन खान याला विचारला. त्यावेळी पुरुषाची कॉलर पकडतात त्याप्रमाणे अमिन खान याने तरुणीच्या आईचे ब्लाऊज पकडून स्पर्श केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याशिवाय जीवे ठार करण्याची धमकी दिल्याचा देखील महिलेकडून आरोप करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 143, 147, 354, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उप निरीक्षक परवीन तडवी करत आहेत. संशयीत अद्याप अटक नसल्याचे समजते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment