जळगाव : अनुभूती निवासी स्कूलच्या दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 12 वी आयएससीच्या निकालात आत्मन अशोक जैन हा 97.75 टक्के गुणांसह शाळेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला, तसेच तो शाळेच्या विज्ञान शाखेतून प्रथम आला आहे. त्याला गणित विषयात पैकीच्या पैकी 100 गुण मिळाले तर इंग्रजीत 98, केमिस्ट्रीत 97, फिजीक्स 96, कॉम्प्युटर 96 असे गुण प्राप्त झाले आहेत. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. संपूर्ण भारतातून 96,940 विद्यार्थ्यांनी 12 वी इयत्तेसाठी परिक्षा दिली. त्यापैकी 96,340 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात 45,579 विद्यार्थीनी तर 50,761 विद्यार्थी यांचा समावेश आहे. अनुभूती स्कूलमधून 29 विद्यार्थी या परिक्षेला बसले होते.
अभ्यासात सातत्य हेच यशाचे गमक – आत्मन जैन
श्रध्देय भवरलालजी जैन हे माझे दादाजी नेहमी कार्यमग्न असलेले मी पाहिले आहे. त्यांच्या संस्कारातूनच नियमीत अभ्यासाला प्राधान्य दिले. परिक्षा जवळ आल्यावर खूप अभ्यास करण्यापेक्षा वर्षभर अभ्यासात सातत्य ठेवले, यामुळेच हे यश मिळाल्याची भावना आत्मन अशोक जैन याने व्यक्त केली. गणित विषयात पैकीच्या पैकी 100 गुण मिळाले यामागेही आजोबा, वडिल आणि परिवारातील सर्व ज्येष्ठ सदस्यांचे आशिर्वाद तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले अशी आत्मन जैन याने प्रतिक्रिया दिली