सोरट जुगार धाडीत पाच जणांना अटक

On: July 25, 2022 10:17 PM

जळगाव : जळगाव शहरातील तांबापुरा भागातील टिपू सुलतान चौकात सोरट जुगार खेळणा-यांसह खेळवणा-या अशा एकुण पाच जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

शेख आसिफ शेख अन्वर, शेख अकिल शेख अहमद, रईसखान अकबरखान, शेख हुसनोद्दीन शेख समशोद्दीन, फारुख तालीक अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या कब्जातून जुगाराच्या साधनासह एकुण 2460 रुपये हस्तगत करण्यात आले आहे. पो.कॉ. इमरान रहिम बेग यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. पो. हे. कॉ. अल्ताफ इस्माईल पठाण, पो. कॉ. चंद्रकांत पोळ, इमरान बेग आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment