अवैध वाळूसाठा चोरी होण्यास दिड महिना कालावधी- तलाठ्यांनी गुन्हा दाखल करण्यास चार महिने अवधी!!

On: July 26, 2022 1:48 PM

जळगाव : सुमारे चार महिन्यापुर्वी जप्त केलेल्या अवैध वाळूसाठ्याची चोरी दिड महिन्याच्या कालावधीत घडली. त्यानंतर अडीच महिन्यांनी या चोरीचा गुन्हा भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे. भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय येथील पडीक शेतात जमा केलेल्या वाळू साठ्याच्या चोरी प्रकरणी तलाठी जयश्री सुधीर पाटील यांनी सदर गुन्हा दाखल केला आहे.

बारा हजार रुपये किमतीचा विस ब्रास अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला होता. जप्त करण्यात आलेला वाळू साठा बेलव्हाय येथील शोभाबाई कदेव नेहेते यांच्या पडीक शेतात ठेवण्यात आला होता. या वाळूसाठ्याची 31 मार्च ते 13 मे 2022 या कालावधीत चोरी झाली. या चोरीप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध 25 जुलै रोजी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे. पो.नि. विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक गणेश गव्हाळे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment